Eknath shinde : दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील



ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करतमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मात्र राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की,अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार आहे. याबाबत अजित पवार वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितपर्व असं लिहत एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्विटवरून राजकारण तापले आहे.

अशातच राज्यातील अनेक ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री अजित पवार’, असे फलक झळकवण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना मोठा दावा केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असं विधान संजय राऊत यांनीकेलं आहे. हे सगळं ठरल्याप्रमाणे स्क्रिप्टने होईल. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहे. हे मी आधी देखील सांगितलं आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, आज अजित पवार यांचा आज म्हणजेच शनिवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. सध्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे की,’मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं ट्विट करत मिटकरी यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ अजित पवार यांचा भाषणाचे क्लिप असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने