ब्युरो टीम :उत्तम आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीसोबतच योग्य आहाराचीही गरज असते.संतुलित आहार अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतो. यामुळेच लोक आहारात काजू बदाम शेंगदाण्यांचा समावेश करतात.
काहींना बदाम खायला आवडतात तर काहींना शेंगदाणे खायला आवडतात.परंतु लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की बदाम आणि शेंगदाण्यामध्ये काय जास्त पौष्टीक आणि फायदेशीर आहे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी किंवा बुद्धी तल्लख होण्यासाठी बदाम खा!, असा सल्लाही अनेकजण देत असतात. दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, चला तर मग जाणून घेऊया दोघांपैकी कोणता सर्वोत्तम आहे.
बदाम की शेंगदाणे?
बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील असते. दुसरीकडे, शेंगदाण्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात व्हिटॅमिन बी, थायामिन, व्हिटॅमिन बी6, बी9, अँटीऑक्सिडंट्ससह अनेक खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
जर तुम्ही मूठभर बदाम आणि शेंगदाणे समान प्रमाणात घेतले तर भाजलेल्या बदामामध्ये सुमारे १७० कॅलरीज, सुमारे ६ ग्रॅम प्रथिने आणि ३ ग्रॅम फायबर असतात. शेंगदाण्यामध्ये सुमारे १६६ कॅलरीज, ७ ग्रॅम प्रथिने आणि सुमारे २ ग्रॅम फायबर असतात. यावरून हे समजते की व्हिटॅमिन बीच्या बाबतीत शेंगदाणे अधिक चांगले आहेत. तर व्हिटॅमिन ईसाठी बदाम हा एक चांगला पर्याय आहे. शेंगदाणे आणि बदाम दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत.
जाणून घ्या कधी काय खाणं योग्य ठरेल
बदाम आणि शेंगदाणे या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ असते. जर तुम्हाला त्याचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही बदाम खाल्ले पाहिजे.
दुसरीकडे, जर तुम्हाला ‘बी’ व्हिटॅमिनची गरज असेल, तर तुमच्यासाठी शेंगदाणे खाणे चांगले होईल कारण त्यात ‘बी’ जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त आहे.
मॅग्नेशियमच्या बाबतीत, बदाम हे शेंगदाण्यापेक्षा चांगले आहेत, तुम्ही शेंगदाण्यापेक्षा बदामांमधून जास्त मॅग्नेशियम घेऊ शकता.
लोह आणि कॅल्शियमसाठी बदाम खाल्ल्यास चांगले फायदे मिळू शकतात, कारण हे दोन्ही घटक शेंगदाण्यापेक्षा २ पट चांगले आहेत.
फॅट्सबद्दल बोलायचे झाले तर या दोघांमध्ये फारसा फरक नाही. हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही दोन्हीपैकी एकही खाऊ शकता.
बदामाच्या तुलनेत शेंगदाण्यांची ऍलर्जी लोकांना त्रास देऊ शकते. तर बदामाला कमी ऍलर्जी असते. अशाप्रकारे, तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार बदाम किंवा शेंगदाणे तुमच्यासाठी आरोग्यदायी असतील.
बदामाचे फायदे
भिजवलेले बदाम खाणे हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. भिजवलेले बदाम पचायला सोपे जाते तसेच ते केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. रोज भिजवलेले २ बदाम खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरु शकते.
वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. बदाम खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोग आणि साखर वाढीचा धोका कमी होतो. यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. यात मॅग्नेशिअम फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन, फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.
शेंगदाणे खाण्याचे फायदे
शेंगदाणे खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे रात्री मूठभर भिजवून सकाळी खाल्ल्यास ते थोडे थंड होते. असे केल्याने शेंगदाणे चांगले पचते. या दोन्हींतील पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर आहेत, हे यावरून सिद्ध होते.
शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि शरीराला काही सूज असेल तर ती आटोक्यात राहते. मात्र शेंगदाणे फक्त मूठभर खावे त्यापेक्षा अधिक खाऊ नये. यामुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते. शेंगदाण्यांमुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
टिप्पणी पोस्ट करा