ब्युरो टीम: पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बरेच बदल होत असतात. अशावेळी अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे फुफ्फुसांवर परीणाम होतो आणि छातीत कफ साचू लागतो. फुफ्फुसं आणि श्वासनलिकेत कफ जमा झाल्यानं खोकला होतो.
हर्बल औषध खोकल्यावर रामबाण उपाय ठरतात. आयुर्वेदीक वैद्य मिहिर खत्री यांनी सांगितले की, एक होममेड गोड औषध २ वर्षांच्या लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेऊ शकतात. (Best Natural Cough Remedies and Prevention Tips) यामुळे खोकल्यापासून त्वरीत आराम मिळेल.
हे औषध कसे बनवायचे?
प्रथम अडूळश्याची पाने पाण्याने धुवा. नंतर खलबत्त्यात व्यवस्थित वाटून घ्या. थोडं पाणी घाला जेणेकरून मिश्रण पातळ होईल. आता एक भांड्यात मध आणि वाटलेली पानं एकत्र करून खोकला झालेल्या व्यक्तीला १ चमचा द्या. या उपायानं वारंवार खोकला येणं, दमा, फ्लू आणि गळणाऱ्या नाकापासून आराम मिळतो, कफ बाहेर निघतात. (Natural Cough Remedies)
टिप्पणी पोस्ट करा