ब्युरो टीम : 'एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेली 30 ते 40 वर्षांपासूनची तयारी आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम फ्रान्समधील नागरिक भोगत आहेत. युरोपमधील अन्य देश आता सतर्क झाले असून फ्रान्समध्ये जे घडले ते कुठेही घडू शकते. आज भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसवले जात आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या घुसखोरांविषयी भारत सरकराने कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील,' असा इशारा ओडिशा, भुवनेश्वर येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक तथा अभ्यासक अनिल धीर यांनी दिला आहे.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. यावेळी धीर पुढे म्हणाले की,'पोलंड आणि जपान या देशांनी प्रारंभीपासूनच अवैध घुसखोरी होऊ दिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसुद्धा याच धर्तीवर प्रयत्नरत आहेत. हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्ये कठोर कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीवरून भारताने धडा घेऊन अवैध घुसखोरी आणि वास्तव्याविषयी देशात कठोर कायदे लागू करायला हवेत.'
यावेळी ‘विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल, जर्मनी येथील सुप्रसिद्ध लेखिका मारिया वर्थ यांनीही आपले मत मांडले.
टिप्पणी पोस्ट करा