Icc world cup 2023: कप स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विंडीज सहभागी होणार नाही.



ब्युरो टीम : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं बिगूल वाजलंय. भारतात 2011 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 25 जून रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यानंतर क्रिकेट चाहत्यांची उत्सूकता आणखी शिगेला पोहचली. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघांनी थेट एन्ट्री घेतली आहे. तर उर्वरित 2 जागांसाठी आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे.  या स्पर्धेत सध्या सुपर 6 राउंड खेळवण्यात येत आहे.

या सुपर 6 मधील तिसऱ्या सामन्यात 1 जुलै रोजी स्कॉटलँड विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना रंगला.  विंडिजसाठी हा ‘करो या मरो’  असा सामना होता.  झिंबाब्वे आणि त्यानंतर नेदरलँड असे सलग 2 सामने गमावल्यानंतर विंडिजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा होता. मात्र विंडिजला स्कॉटलँडकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. विंडिजचं या पराभवासह वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे विंडिज वर्ल्ड कप स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सहभागी होणार नाही.

विंडिज टीमने 1975 आणि 1979 साली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय.  विंडिजने 2 वेळा टी 20 वर्ल्ड कपही जिंकलाय.  एकूण 4 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पात्रता फेरीआधीच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावते हे क्रिकेट चाहत्यांनाही न पटणारं आहे. मात्र तीच खरी परिस्थिती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने