ITR Filing : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय? वाचा अशावेळी काय करायचे



ब्युरो टीम : आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.  त्यातच, देशातील १ लाख करदात्यांना आयकर विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती सोमवारी (२४ जुलै)  एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.  त्यामुळे जर तुम्हालाही आयकारची नोटीस मिळाली असेल, तर घाबरू नका. अशावेळी नेमकं काय करावे, त्याची माहिती आज आह्मी देत आहोत.

नोटीस मिळताच सर्वप्रथम ती नीट वाचा. सामान्यत: कमी दाखवलेले उत्पन्न, कर भरणामधील विसंगती, विशिष्ट आर्थिक व्यवहार उघड न करणे किंवा इतर कोणत्याही कर-संबंधित बाबींशी संबंधित आयकर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकते.जर तुम्हाला तुमच्या नोटीसबद्दल काही समजत नसेल किंवा तुम्हाला काय उत्तर द्यावे हे माहित नसेल तर तुम्ही तज्ञ किंवा सीए ची मदत घेऊ शकता. तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्ही हे काम सहज करू शकता.

करदात्यांना लक्षात ठेवा की, प्रतिसाद देण्यासाठी नोटिसमध्ये नमूद केलेल्या कालमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीत प्रतिसाद न दिल्यास संभाव्य दंडासह पुढील अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विलंब टाळण्यासाठी या नोटिसांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आणि कर अधिकाऱ्यांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने