ब्युरो टीम: मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. केतकी चितळेने मोठा खुलासा केलाय. केतकीच्या आयुष्यावर आता पुस्तक येणार आहे. केतकीने स्वतः याचा खुलासा केलाय.
केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होतं. केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली होती. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात केतकीला ४१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला.
काल रात्री केतकीनं इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होत. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीबाबत तुमचं मत मांडा.
एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, असे अनेक मुद्दे केतकीने इन्स्टाग्रामवर लाईव्हवर मांडले.
याच वेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना मोठा खुलासा केला. केतकी म्हणाली कि पुढच्या वर्षी माझ्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं तिने सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा