ब्युरो टीम : रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या (irshalwadi accident) पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. (Land Slading) या दरडीखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले. बचावकार्य सुदधा युदध पातळीवरु सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच अॅक्शन मोडमध्ये
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री हे मुंबईत वॉर रुममध्ये सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून, तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं नियंत्रण करीत आहेत.
फडणवीस स्थानिकांच्या संपर्कात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच ट्विट करुन मृत्यांन श्रद्धांजली वाहिली. तसेच आपण स्थानिकांच्या संपर्कात असून, जी काही मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत, त्यामुळं एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे लगेच सक्रिय झाले. यामुळं यातून हे सरकार कसे गतिमान आहे हे दिसून येत आहे.
अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामान चांगलं झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडी आरएफ टीम काम करीत आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू आहे.आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
टिप्पणी पोस्ट करा