Kharghar : खारघर दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

 


 ब्युरो टीम : खारघरच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना धर्माधिकारी कुटुंबियांनी किती मदत केली असा मुद्दा विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. यावर सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलं आहे. आमदार कपिल पाटील यांनी मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांना धर्माधिकारी कुटुंबियांनी किती मदत केली असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 'मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत धर्माधिकारी कुटुंबियांनी केली आहे.' 

काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी खारघर दुर्घटनेचा उपस्थित केला. यावर बोलताना भाई जगताप यांनी म्हटलं की, "त्यादिवशी 42 डिग्री तापमान होतं. तरीही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा सत्तेचा माज चालणार नाही. हे सगळं सत्ताधारी पक्षाच्या मुळावर येणार आहे. तसेच यामध्ये एक समिती स्थापन केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर समितीला देखील आणखी वेळ वाढवून देण्यात आला. निवृत्त न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही केली. पण ती देखील मान्य केली नाही." 

यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी न्यायालयीन चौकशी का केली नाही याचं स्पष्टीकरण दिलं. नैसर्गिक किंवा मानवी दोषांमध्ये आपण कोणतीही चौकशी करत नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. यासंदर्भात त्यांनी अनेक घटनांचा देखील उल्लेख केला. तर तहसीलदार, जिल्हाधिकारी या सगळ्यांनी जाऊन पाहणी केली. असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने