ब्युरो टीम : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी व त्याचा अव्वल जोडीदार चिराग शेट्टी यांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या या सर्वात मानांकित जोडीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले.
या जोडीने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि महंमद रियान अर्दियांटो या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव केला व करंडकावर नाव कोरले.
अंतिम लढतीत या जोडीने पहिला गेम गमावला. मात्र, त्यांनी दुसरी गेम सुरू झाल्यावर अफलातून रिटर्न व व्हॉलीचा खेळ करत वर्चस्व गाजवले. हा गेम जिंकत त्यांनी सामन्यात बरोबरी केली. तिसरी गेमही त्यांनी थायलंडच्या जोडीला दडपणाखाली ठेवत जिंकली व विजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयानंतर दोघांनीही त्यांचा प्रसिद्ध गंगनम स्टाइलमध्ये डान्स करत आपला आनंद साजरा केला.
टिप्पणी पोस्ट करा