ब्युरो टीम : विरोधी आघाडीचे लोक जनता दल-सेक्युलर पक्षाला कधीही आपला भाग मानत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आम्हाला बंगळुरूच्या बैठकीला निमंत्रणही दिलेले नाही. तथापि आम्हींही विरोधकांच्या कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही अशी भूमिका जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
आमच्या पक्षाला 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडूनही निमंत्रण मिळालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप प्रणित रालोआकडून निमंत्रण आल्यास आपण जाणार का असे विचारता ते म्हणाले की, हा निर्णय निमंत्रण आल्यावर घेतला जाईल. दरम्यान जेडीएस लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपबरोबर जाणार आहे अशा बातम्या या आधीच आल्या असून जेडीएसच्या नेत्यांनीही त्या संबंधी सुतोवाच केले आहे.
पक्षाचे प्रमुख देवेगौडा यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळेच कॉंग्रेस प्रणित आघाडीच्या बैठकीसाठी त्यांना निमंत्रण दिले गेले नाही असे सांगितले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा