Lokmanya Tilak Award Ceremony : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला शरद पवार येणार का नाही? विखे पाटील स्पष्टच बोलले



विक्रम बनकर, नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे येथे  मंगळवारी (१ ऑगस्ट) प्रदान करण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार  सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थित राहू नये, अशी मागणी महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले असतानाच भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.  'शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत का नाही? याची आम्हाला कुठलीही चिंता नाही,' असं विखेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना गौरविले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर असणार आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे.  त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाला शरद पवार उपस्थित राहणार की नाही राहणार, याची चर्चा करण्याचे कारण नाही,' असे सांगतानाच विखे पाटील म्हणाले,' आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे विश्वनेते म्हणून संपूर्ण जगाने आज नेतृत्व स्वीकारले आहे. आता ते लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. या पुरस्कार सोहळ्याला कोणी हजर राहिल्याने किंवा न राहिल्याने कार्यक्रमावर काही परिणाम होईल असे वाटत नाही,'असेही विखेंनी सांगितले.

पहा व्हिडिओ




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने