ब्युरो टीम : राज्य विधिमंडळाच्या तीन आठवडय़ांच्या पावसाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. संख्याबळ घटले असले तरी विरोधक माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट करीत विरोधकांनी आक्रमक होण्याचे सूचित केले आहे. दुसरीकडे, सरकारच्या पाठीशी २१० पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असून विरोधी पक्ष आत्मविश्वास गमावलेला आणि गोंधळलेला दिसत आहे. विरोधी पक्ष आहे कुठे, असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
दरम्यान, दुसरीकडे पावसाने दगा दिल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकले आहे. राज्याची निम्मी लोकसंख्या अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रातील पीछेहाट सरकारसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.
राज्यात तीन महिन्यांत आठ ठिकाणी झालेले जातीय तणाव, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका, कायदा आणि सुव्यवस्था आदी विषयांवर सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा