Major League Cricket: IPL नंतर अमेरिकेतही मुंबईच ठरली चॅम्पियन; MLC च्या अंतिम सामन्यात मिळवला जोरदार विजय



ब्युरो टीम : अमेरिकेत पहिल्यांदाच मेजर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची फ्रँचायची असलेल्या MI न्यूयॉर्क संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार MI न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास या दोन्ही संघांमध्ये पार पडला. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावुन फलंदाजीला आलेल्या सिएटल ऑर्कास संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ९ गडी बाद १८३ धावा केल्या होत्या. सिएटल ऑर्कास संघाकडून खेळताना क्विंटन डी कॉकला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

त्याने या डावात अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने सिएटल ऑर्कास संघाची धावसंख्या १५० धावांच्या पार पोहचवली.

क्विंटन डी कॉकने या सामन्यात ५२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. तेसच शुभम रंजनने २९ धावांची खेळी केली.

निकोलस पूरनची तुफानी खेळी..

या धावांचा पाठलाग करताना MI न्यूयॉर्क संघाने २४ चेंडू शिल्लक असतानाच ७ गडी राखून विजय मिळवला. या धावांचा पाठलाग करताना MI न्यूयॉर्क संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. MI न्यूयॉर्क संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला होता. स्टिव्हन टेलर ३ चेंडूंचा सामना करत माघारी परतला.

त्यानंतर शायन जहागीरला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. शेवटी कर्णधार निकोलस पूरनने २४९.०९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ५५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने २० धावांचे योगदान दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने