ब्युरो टीम : पुणेकर व पिंपरी चिंचवडकर यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो सेवेचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर एक ऑगस्टपासून होणार असल्याची माहिती मिळतेय. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) दरम्यानच्या मेट्रो मार्गांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मान्यता मिळाली आहे. या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दर १० मिनिटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रो उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येतेय.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड दरम्यान आता प्रवास मेट्रोने अगदी जलद होणार आहे. या दोन शहरांतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जुना पुणे-मुंबई हा एकमेव रस्ता असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. मेट्रो सेवेमुळेमुळे हा वेळ अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मार्च महिन्यात वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सेवा कार्यान्वित झाली होती. त्यानंतर मेट्रोच्या विस्तारासाठी पुणेकरांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. अखेर सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या एक ऑगस्टच्या दौऱ्यात मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू होणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा