MVA: मविआचं ठरलं! विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता, उद्या घोषणा



ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे बदलले आहे.

विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने