NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षातही 'एनडीए' विरूद्ध 'इंडिया';



ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट फडली. यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या इंडिया या आघाडी सोबत राहणार की एनडीए सोबत जाणार? या प्रश्नाचं उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.

मागच्या महिन्यात पाटणा येथे झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीत पटेल सहभागी झाले होते. यानंतर मंगळवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते सहभागी झाले. 

दरम्यान एनडीएच्या बैठकीनंतर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएचा अविभाज्य भाग असून त्यांचा पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल असे स्पष्ट केलं. 

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी आणि अजित पवार आज(मंगळवार) एनडीएच्या बाठकीत इतर राजकीय पक्षांसोबत उपस्थित होतो. एनसीपी, एनडीएचा अविभाज्य भाग आहे, भविष्यात एनसीपी, एनडीएसोबत राहून काम करेल.

पटेले पुढे बोलताना म्हणाले की, एनडीएला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने ३८ राजकीय पक्ष उपस्थित होते. आमच्याकडून मी आणि अजित पवार यांनी बैठकीत आपलं म्हणणं मांडलं. दरम्यान सोमवारी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत बंड केलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. 

यावेळी पटेलांनी पक्ष एकसंध राहण्यासाठी विचार करावा अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती, यावर शरद पवारांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासह मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने