NCP Minister Meet Sharad Pawar: चर्चाना उधाण?अजित पवार राष्ट्रवादीच्या मत्र्यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला

 


ब्युरो टीम : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबतची आत्ताची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत.

वाय. बी. चव्हाण सेंटरवर हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रिपदाची शपथ घेणारे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांचा आश्रय या मंत्र्यांना मिळणार का आणि समजोता होणार का? हे पाहावे लागणार आहे.

उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, संजय बनसोडे, आणि दिलीप वळसे-पाटील हे सर्व नेते उपस्थित आहेत.

विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले जयंत पाटील हे देखील बैठक सोडून वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी फोन करताच जयंत पाटील हे तातडीने वाय बी चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे देखील आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मंत्र्यांना आक्रमक न होण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने