Oral Health : दात घासताना टूथपेस्ट किती वापरावी, कधी विचार केलाय? जाणून घ्या



ब्युरो टीम : प्रत्येकजण स्वतःच्या दातांची चांगली स्वच्छता व्हावी, यासाठी टूथपेस्ट किती वापरावी? याबाबत संभ्रमात असतो. अनेकांना वाटतं की, जास्त टूथपेस्ट वापरल्यानं दातांची चांगली स्वच्छता होऊ शकते. पण तसं अजिबात नाही. उलट टूथपेस्टच्या अतिवापरामुळे दातांसह तोंडाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टचा वापर हा चवीसाठी म्हणून न करता फक्त तोंडात फेस होईल इतकाच करावा. लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती या दोघांसाठी टूथपेस्ट वापरण्याचं प्रमाण हे सारखचं आहे. परंतु मुलांचे दात नाजूक आणि कमकुवत असतात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. चला तर, दातांना स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.

दात घासताना किती टूथपेस्ट वापराल?

दातांच्या चांगल्या स्वच्छतेसाठी दर्जेदार टूथपेस्ट वापरणं फायदेशीर ठरू शकतं. हेल्थ डॉट कॉम नुसार, टीव्हीवर किंवा जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणारे टूथपेस्टचं प्रमाण केवळ लोकांना जाहिरातींची माहिती देण्यासाठी असते. सर्वसाधारणपणे, एवढी टूथपेस्ट वापरल्यानं तोंडाच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या व्यक्तीनं एका वेळी फक्त वटाण्याच्या आकारा एवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे. ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवर देखील लिहिलेली असते. मात्र, त्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही.

मुलांसाठी ठरू शकते हानिकारक

जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणं मुलांसाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात टूथपेस्टचा वापरामुळे मुलांच्या दुधाचे दात खराब होऊ शकतात. कारण प्रमाणापेक्षा जास्त टूथपेस्टच्या वापरामुळे फ्लोराईड जास्त प्रमाणात तोंडामध्ये जातं, व ते विकसनशील दातांवर फ्लोरोसिस नावाची कॉस्मेटिक स्थिती निर्माण करू शकते. कॉस्मेटिक समस्यांमुळे दातांवर पिवळे आणि तपकिरी डाग पडू शकतात, तसेच काही वेळा दातांमध्ये फट देखील पडू शकते. म्हणूनच प्रत्येकानं वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने