ब्युरो टीम : पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. अमरावती पोलिस दलात कार्यरत असलेले एसीपी भरत गायकवाड हे पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा