Pune Metro : वाचा पुणे ते पिंपरी चिंचवड मेट्रोच्या तिकीटाचे दर किती?



ब्युरो टीम : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. या दोन्ही शहरातील मेट्रोच्या विस्ताराची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दर १० मिनिटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावर मेट्रो उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सेवा कार्यान्वित झाली होती. त्यानंतर मेट्रोच्या विस्तारासाठी पुणेकरांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावरील मेट्रो सुरू होण्यासाठी मुहूर्त ठरला आहे. आता या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना किती तिकीट लागेल, याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चला तर, जाणून घेऊ कोणत्या मार्गावर प्रवाशांना किती तिकीट द्यावे लागेल. 

जाणून घ्या काय असतील तिकीटाचे दर? 

वनाझ ते रुबी हॉल : 25

पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : 30

वनाझ ते पिंपरी-चिंचवड : 35

रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : 30

वनाझ ते डेक्कन जिमखाना : 20

वनाझ ते संभाजी उद्यान : 20

वनाझ ते पीएमसी : 20

वनाझ ते शिवाजीनगर : 25

वनाझ ते सिव्हिल कोर्ट : 25

वनाझ ते रेल्वे स्टेशन : 25

रुबी हॉल ते शिवाजीनगर : 15

रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : 20

पिंपरी-चिंचवड ते पीएमसी : 30

पिंपरी-चिंचवड ते पुणे रेल्वे स्टेशन : 30

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने