Pune univesity : जयकर ग्रंथालया समोरील गार्डनला तारेचे कुंपण, राहुल ससाणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा विरोध

 


ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील जयकर ग्रंथालयाची इमारत ही ऐतिहासिक अशी वास्तू आहे . या जयकर ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीच्या समोर जे गार्डन आहे , त्या गार्डनला चारही बाजूने तारेचे कुंपण करून त्याला बंदिस्त करण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या चालू आहे . विद्यार्थ्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे. अनेक विद्यार्थी या गार्डनमधील बाकांवरती बसून अभ्यास करत असतात , अभ्यास विषयक चर्चा करत असतात , काही विद्यार्थी तिथे बसून डब्बे देखील खात करत असतात . ज्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना गावाकडून भेटायला येतात ते देखील या ठिकाणी बसतात . अशा सर्व विद्यार्थी व पालकांची या बंदिस्तिकरणामुळे गैरसोय होणार आहे. त्यामुळे आज माननीय कुलगुरू यांना त्यासंबंधीचे एक पत्र विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. अगोदरच विद्यापीठांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बंदिस्तिकरण करण्यात आलेले आहे . आणि आता अजून त्यामध्ये भर नको अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. विद्यापीठ हे ज्ञानाचे मुक्त केंद्र असला पाहिजे , त्याला विद्यापीठ प्रशासन बंदिस्त करू शकत नाही नको त्या गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा विद्यार्थी हिताच्या गोष्टीवर विद्यापीठ प्रशासनाने पैसे खर्च करणे अपेक्षित आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने