Raigad Landslide : म्हणून इरशाळवाडी येथे लावण्यात आला कलम १४४



ब्युरो टीम : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. आता या घटनेत मोठी अपडेट आली आहे. प्रशासनाने येथील बचावकार्य  थांबवले असून येथे कलम १४४ लावला आहे. याभागात कलम १४४ लावण्यामागील कारण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे मंत्री सामंत यांनी  आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाची माहिती दिली.  ते म्हणाले,' जेथे दरड कोसळली तेथे  काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष  पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बढे , एनडीआरएफ कंमाडर तिवारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने