Rain Update : आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का? वाचा हवामान विभागाचा काय अंदाज



ब्युरो टीम : मुंबई, पुण्यासह विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यातच आज, सोमवारी देखील राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम असून, कोकणचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आली आहे.

तर, आठवडाभर चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर आज, सोमवारपासून (२४ जुलै) काही भागात ओसरणार आहे. शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरींची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज  भारतीय हवामानशास्त्र विभागाने  व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुण्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच रिपरिप सुरू होती. सकाळी हलक्या सरी; पण दुपारनंतर काही वेळासाठी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पाऊस पडत होता. सुट्टी असली, तरी पावसामुळे नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर फेरफटका, फिरायला जाणे टाळले. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने