Rain Update : आज तुमच्या शहरात पाऊस पडेल का? घराच्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच



ब्युरो टीम : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यातच आज पुन्हा एकदा राज्यातील जवळपास सर्वच भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अतिमूसळधार पाऊस २८ जुलैपर्यंतच राहील आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला  आहे. आज शुक्रवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे, तर २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यालाही आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने