Randeep huda : अभिनेता रणदीप हुडा स्टारडम विसरुन उतरला पुराच्या पाण्यात; पूरग्रस्तांच्या घरी जाऊन करतोय मदत



ब्युरो टीम : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती उद्भवली आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. यामध्येच अनेक स्वयंसेवी संस्था, राज्यशासन शक्य होईल त्या परिने गरजूंची मदत करत आहेत.

यामध्येच बॉलिवूडमधील एक अभिनेता थेट पूराच्या पाण्यात उतरला असून तो पूरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांना मदत पोहोचवत आहे.

सध्या हरियाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी लोकप्रिय अभिनेता रणदीप हुडा (randeep hooda) पुराच्या पाण्यात उतरला आहे. जवळपास गुडघाभर पाण्यात उतरुन रणदीप या पूरग्रस्तांना अन्न-पाणी पुरवत आहे.

होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसोबत पुरात अडकलेल्या लोकांना अन्न-पाणी पुरवण्याचं काम करत आहे. रणदीप खालसा एड फाऊंडेशन या इंटरनॅशनल स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून काम करत असून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड लिन लायश्रामदेखील त्याला मदत करताना दिसत आहे.

'सेवा.. मी इतर सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी मदतीचा हात पुढे करावा', असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रणदीपप्रमाणेच अभिनेता सोनू सूददेखील मुंबईत अडकलेल्या गरजूंना मदत करत आहे. दरम्यान, रणदीपने बॉलिवूडमध्ये फारसं काम केलेलं नाही. मात्र, त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका गाजल्या आहेत. रणदीपने 'मान्सून वेडिंग' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो जिस्म 2, किक, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरबजीत, कॉकटेल या सिनेमांमध्ये झळकला


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने