RSS : सरसंघचालक म्हणाले,'केवळ रोटी, कपडा और मकान एवढेच नाही तर...'



ब्युरो टीम : 'केवळ रोटी, कपडा और मकान एवढेच नाही, तर आजच्या समाजात शिक्षण आणि आरोग्यही आवश्‍यक झाले आहे,' असे वक्तव्य  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर मुंबईतील कांदिवली उपनगरातील श्रीमती धनकुवरबेन बाबूभाई ढाकण रुग्णालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 'देशात असे लोक आहेत, ज्यांना आमचा उदय बघायचा नाही,' असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

'अनेक वेळा नकारात्मक चर्चा ऐकायला मिळतात. पण जेव्हा आपण देशभर फिरतो आणि पाहतो तेव्हा लक्षात येते की, भारतात घडणाऱ्या वाईट गोष्टींपेक्षा ४० पट जास्त चर्चा चांगल्या गोष्टींवर होत आहे,' असे सांगतानाच भागवत पुढे म्हणाले, 'आज देशाच्या उत्कर्षाचे कारण सरकारची धोरणे आणि सरकारमधील जबाबदार लोकांचे कार्य आहे. काही लोक काहीच करत नसल्यामुळेही गोष्टी सुरळीत चालू आहेत. त्यांनी काम केले तर अडचणी येतील. ४० वर्षांपूर्वी भारताला वैभव प्राप्त करून देण्याची लोकांची जी इच्छा होती ती आज अधिक प्रबळ झाली आहे. ती आणखी वाढली पाहिजे. देशात असे लोक आहेत ज्यांना आमचा उदय बघायचा नाही. पण चांगलं काय वाईट हे ठरवण्याचा कसला मापदंड आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने