ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाराणसीत बोलताना निवडणुकांबाबत सूचक विधान केलं आहे. 'राजा चुकला तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं,' असं ते म्हणाले आहेत. हे वक्तव्य करताना भागवत यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
वाराणसीत एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले,'आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं काम पाहतो, झोपत नाही. जे चांगलं काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं आणि जर राजा चुकला, तर त्याचंही फळ त्यांना निवडणुकीत मिळतं,' असे सांगतानाच भागवत यांनी पुढे सांगितले की,'आपला समाज निसर्ग आणि परंपरेबाबत राजावर अवलंबून नसतो. राजाचं काम असतं आणि तो ते काम करत असतो. राजाने त्याचं काम व्यवस्थित करावं हे समाजाला पहावा लागतं. लोकशाहीत जसं काम चालतं तसं. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते देश चालवत असतात.'
टिप्पणी पोस्ट करा