ब्युरो टीम : मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अधिस्वीकृती समित्या गठीत केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
तब्बल सहा वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्या जाहीर केल्या आहेत. या समित्यांवर परिषदेचे तब्बल 16 प्रतिनिधी घेतले गेले आहेत. परिषदेला समित्यांवर योग्य स्थान दिल्याबद्दल देखील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
आज मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार,मुंबई शाखेचे उपाध्यक्ष विनायक सानप आदि उपस्थित होते.
.........
टिप्पणी पोस्ट करा