Sanjay raut : शिंदेगट राज्यकर्ता पक्ष नाही, त्यांच्यात अन् अजित पवार गटात जमीन आसमानचा फरक- संजय राऊत



ब्युरो टीम : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेगट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जमीन आसमानचा फरक असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार आणि अजित पवारांना देण्यात आलेल्या अर्थखात्यावरूनही संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. पण शिंदे गट आणि अजित पवारांनामध्ये खूप फरक आहे. शिंदे गटाला किती महत्व आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यांचं महत्व फक्त शिवसेना फोडण्यासाठीचं होतं. आता शिंदे गटाचं महत्व संपलं आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

शिंदे गटात अनेक नेते आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांचा सरकारमधील अनुभव दांडगा आहे. अजित पवार यांच्या निर्णयाचं आम्ही समर्थन करत नाही. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. यामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार आहे. पण आता भाजपच्या दृष्टीने शिंदे गटाचं असेललं महत्व लक्षात येतं आहे, असं राऊत म्हणालेत.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने