ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. शरद पवार यांचे आमदार अजितदादांच्या गटात सामील झाले. मात्र, पुम्हा एकदा शरद पवारांच्या गटात फूट पडणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यामुळे आपणही अजित पवारांसोबत सत्तेत जायला हवं, असं शरद पवारांच्या आमदारांनी म्हटलं आहे. तर काही आमदारांनी आपण शरद पवारांसोबत राहायला हवं असं मत व्यक्त केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा