Sharad pawar : पवार साहेब मोदी सोबत बसण्याअगोदर एकदा विचार करा ;कॉग्रेस नेत्यांचे पवारांना आवाहन



ब्युरो टीम  :पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात असणार आहेत. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत.

पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या, आमदार वर्षा गायकवाड यांनीही असंच वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्याचा निषेध करतोय.अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाहीये. त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणं, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस तर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने