ब्युरो टीम: जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला होता.या अंतर्गत दोन हजार ४०० उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केलेली आहे.
कार्यक्रमस्थळी डोंगरे वसतिगृह मैदानावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी नऊ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
सुमारे ४८ कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होताना नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची तांत्रिक चाचणी व मुलाखती घेतल्या.
यातून दोन हजार ४०० उमेदवारांची प्राथमिक निवड कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली असून, यापैकी १८७ उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. दरम्यान, तब्बल चार हजार ५०१ जागा रिक्तच राहिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा