ब्युरो टीम : ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. या बहुचर्चित स्पर्धेतील सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी क्रिकेट वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेआयसीसीच्या प्रोमोवरून टीका केली आहे.
खरं तर आयसीसीने जारी केलेल्या प्रोमोमध्ये पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम नसल्याने अख्तरने नाराजी व्यक्त केली. आयसीसीवर टीका करताना त्याने म्हटले, "पाकिस्तान आणि बाबर आझम यांच्याशिवाय विश्वचषकाचा प्रोमो पूर्ण होईल असे ज्यांना वाटत आहे, त्यांनी एक विनोद सादर केला. त्यामुळे चला मित्रांनो, थोडे मोठे होण्याची वेळ आली आहे." एकूणच विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख न केल्याने अख्तरने टीका केली. या प्रोमोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची झलक अनेकांचे लक्ष वेधणारी आहे.
टिप्पणी पोस्ट करा