ब्युरो टीम: मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील पाचवा आगामी सिनेमा 'सुभेदार' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात अभिनेता अजय पुरकर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले. तानाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा या मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यातलं 'आले मराठे आले मराठे' या गाण्यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
'आले मराठे आले मराठे' हे गाणं स्वत: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं आहे. या गाण्याला रसिकांची पसंती मिळताना दिसतेय. गाणं रिलीज होताच युट्यूबवर काहीच वेळात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. पण तुम्हाला माहितीए का हे गाणं दिग्पाल लांजेकरांनी फक्त पाच मिनिटांत लिहून पूर्ण केलंय. गाण्याचे बोल खूपच अप्रतिम आहेत.
दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. १८ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होतोय. त्यांचे आतापर्यंत आलेले फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेरशिवराज हे चित्रपट चांगलेच गाजले. त्यांच्या या शिवराज अष्टक सिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय.
टिप्पणी पोस्ट करा