Suresh chavhanke :जनआक्रोश मोर्चामुळे कोपरगावमध्ये धडकले भगवे वादळ



 ब्युरो टीम : युवतीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा झालेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांनी आज कोपरगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येने हिंदूत्ववादी संघटनांसह नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

डोक्‍यावर भगवी टोपी, हाता भगवे ध्वज घेवून हजारो नागरिक लव्ह जिहाद प्रकरणावरून आपला आक्रोश घोषणा देवून व्यक्त करत होते. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या मोर्चात सहभागी होता.

यावेळी बोलतांना सुरेश चव्हाणके म्हणाले की, जो व्यक्ती कधी पाहिला नाही. कधी भेटला नाही. त्याच नाव गाव निट माहीत नाही, अशा अनोळखी व्यक्तीबरोबर मोबाईलवर गप्पा मारुन व चॅटिंग करून प्रेम होतं असेल तर त्या आईने नऊ पोटात वाढवून जन्म दिला. 20 वर्ष रक्ताचा पाणी करुन सांभाळणाऱ्या आई बापाचे प्रेम या मुलींना का दिसत नाही किंवा त्यांच्यावर प्रेम का होते नाही, असा सवाल त्यांनी केला.

सकाळी 10 वाजता सकल हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव तालुक्‍यासह विविध ठिकाणाहून हजारो नागरिक मोर्चामध्ये सामिल झाल्याने कोपरगाव शहरात भगवे वादळ धडकल्याने चित्र दिसत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मोर्चाला सुरूवात झाली. गांधी चौक, एसजी विद्यालय, छत्रपती संभाजी महाराज पुतळा मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आले. येथे मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले.

चव्हाणके पुढे म्हणाले की, धर्मांतरांच्या घटना या पुढे राज्यात चालु देणार नाही. त्या विरोधात कायदा झाला पाहिजे. राज्यातल्या गडकिल्ल्‌यांमध्ये मदरशा, मस्जिदी वाढत असून तिथे हिरवे झेंडे व चादरी फडकत आहेत. संपुर्ण पाकिस्तानात 35 हजार मदरशा आहे. मात्र एकट्या महाराष्ट्रात तब्बल 74 हजार मदरशा आहेत. मदरशामुळे पाकिस्तान कंगाल झाल्याचे तेथील लष्करी अधिकारी सांगतात. मग आपल्या राज्याचे भविष्यात काय होवू शकते यावर लक्ष वेधले. हिंदूंच्या करातून मदरशांना अनुदान दिले जाते आणि त्याच मदरशांमध्ये हिंदू विरोधात धडे शिकवले जाते. जगातला सर्वात भोळा हिंदू आहे. स्वतःच्या पैशातुन स्वतःचा जीव धोक्‍यात घालतोय. यापुढे हिंदुंनी सावध भूमिकेत जगलं पाहिजे. स्वतःचे उद्योग व्यवसाय वाढवले पाहिजे राज्यातल्या बॅंका पतसंस्थांनी हिंदू तरुणांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून सहकार्य करावे. हिंदूसाठी लढणाऱ्यांना सहकार्य करा. कोणत्याही राजकीय पक्षात रहा पण हिंदू रहा. जातीवाद सोडला पाहिजे. जातीपेक्षा धर्म मोठा आहे. कोपरगाव शहरात घरोघरी चालणारे कत्तलखाने बंद केले नाही तर आम्ही घरात घुसुन पुरावे देवू, असे म्हणत चव्हाणके यांनी उपस्थितांना कानपिचक्‍या दिल्या.

या मोर्चामध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, विजय वहाडणे, रवींद्र बोरावके, कैलास डोळे, सपना मोरे, विद्या सोनवणे, सुनिल गंगुले, दत्ता काले, पार्श्वगायीका सुरभि कुलकर्णी, यांच्यासह विविध क्षेत्रातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. साधु महंतांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पुजन करून मोर्चाला सुरुवात झाली तर 11 युवतींच्या हस्ते तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना मागण्यांचे निवेदन देवुन मोर्चाची सांगत करण्यात आली.सुत्रसंचलन संतोष गंगवाल यांनी केले.

दरम्यान, आज दिवसभर कोपरगाव शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता तर मोर्चेकऱ्यांना व बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना विविध संघटनांनी अल्पोहार, पाणी, बिस्किटे देवून माणुसकीचे दर्शन घडवले. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाल्याने सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे होते.कोणताही अनुचित प्रकार न घडवता मोर्चा शांततेत झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने