Treking : सह्याद्री खुणावतोय, ट्रेकिंगला जाताना अशी घ्या काळजी



ब्युरो टीम : पावसात गडकिल्ले, घाटवाटा पालथ्या घालण्याचा अनेकांना छंद असतो. त्यामुळे पहिला पाऊस पडताच या मंडळींना सह्याद्री खुणावू लागतो.

पाऊस सुरू झाला की, हिरवाईने नटलेले डोंगर, खळाळणाऱया डोंगररांगा साद घालू लागतात. अशा वेळी ट्रेकर मंडळी तर सोडा, पण आबालवृद्धसुद्धा सह्याद्रीच्या कुशीत जाण्यासाठी बाहेर पडतात. सह्याद्रीतील ट्रेक छोटा असो वा मोठा. प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते. उत्साहाच्या भरात पुरेशी खबरदारी न घेता जर आपण ट्रेकिंगला गेलो तर अनेक अडचणी समोर येऊ शकतात. अशा अडचणी टाळायच्या असतील तर खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात.

  • पावसाळय़ात शक्यतो सोप्या गडकिल्ल्यांची अथवा घाटवाटांची निवड करावी. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असते अशा ठिकाणी जाणे टाळावे.
  • ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी त्या दिवसाची हवामान परिस्थिती समजून घ्यावी. मुसळधार पाऊस सुरू असेल तर बाहेर पडू नये.
  • ट्रेकिंगला एकटे जाण्यापेक्षा ग्रुपने जाणे कधीही उत्तम.
  • पावसाळी कीटकांपासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना शक्यतो फुल पॅन्ट व फुल शर्ट घालावा. पावसात भिजल्यावर जे कपडे जड होतात व पटकन वाळत नाहीत, ते घालू नयेत. रेनकोट वा लवकर वाळणारे कपडे वापरावेत. आपल्यासोबत बॅगमध्ये कोरडे कपडेही घ्यावेत.
  • ट्रेकिंग करताना चांगली ग्रीप असलेले शूज घालावेत.
  • आपल्याजवळील पैसे, कपडे, मोबाइल पावसात भिजू नये म्हणून नेहमी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावे.
  • दरीच्या टोकावर वा धोकादायक सुळक्यावर उभे राहून फोटो घेऊ नका. फेसबुक, इन्स्टावर लाइक वाढवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये.
  • छोटे ओढेनाले दोरीच्या सहाय्याने वा एकमेकांची मदत घेऊन ओलांडणे. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यास पाणी ओसरण्याची वाट पाहावी.
  • उंचावरून ज्या ठिकाणी थेट पाणी कोसळते अशा ठिकाणी बसू नये. कारण पाण्याच्या प्रवाहाबरोबर कधी कधी छोटे-मोठे दगडधोंडेही वाहून येतात. अशा वेळी इजा होण्याची शक्यता असते.
  • आपण ज्या ट्रेकिंग ग्रुपसोबत आलोय त्यांच्याकडे प्रथमोपचाराचे साहित्य आहे का हे विचारून घ्यावे. आपल्या घरच्यांसोबत ग्रुप लीडर्सचे नंबर शेअर करावेत.
  • ट्रेकिंग करताना कर्णकर्कश आवाज काढून शांततेचा भंग करू नये. प्लॅस्टिकचा कचरा कधीही बाहेर टाकू नये. गडावरील पाण्याच्या टाक्यात पोहणे वा कपडे धुणे टाळा. ट्रेकिंगमध्ये धूम्रपान व मद्यपान या दोन्ही गोष्टींना कधीही स्थान देऊ नका.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेकिंग करताना आपल्या पाऊलखुणा सोडून इतर कोणत्याही गोष्टी मागे ठेवून येऊ नये.

गाइडची मदत

तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणार आहात, त्या ठिकाणची आधी माहिती काढून घ्यावी. शक्यतो आपल्यासोबत त्या ठिकाणी जाऊन आलेली व्यक्ती असावी. अशी व्यक्ती नसल्यास एखादा स्थानिक गाइड आपल्या सोबत ठेवावा. तो गाइड ज्या सूचना देईल त्याचे पालन करावे. पावसाळय़ात धुक्यामुळे व दाट झाडीमुळे वाटा चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे वाटेत ठरावीक अंतरावर काही खाणाखुणा कराव्यात. म्हणजे परत येताना वाट चुकण्याची शक्यता राहत नाही.

जळवा, कीटकांपासून सावधान

पाकसाळ्यात दाट जंगलात फिरताना अनेकदा जळकांचा त्रास होतो. अशा केळी आपल्यासोबत मीठ क हळद असणे गरजेचे आहे. जळका आपल्या पायाला चिकटल्या असतील तर त्या ओढून काढू नये. अशा केळी त्यांच्या कर मीठ का हळद टाकाकी म्हणजे त्या गळून पडतात. साप क इतर किटकांपासून बचाक करण्यासाठी आपल्यासोबत नेहमी काठी असाकी. दाट गकतातून मार्ग काढताना काठीचा आकाज कराका. म्हणजे तो आकाज ऐकून आपल्या काटेतील साप क इतर कीटक दूर जातात.

संबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने