VIJAY DARDA : माजी खासदार विजय दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा



ब्युरो टीम : माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, एम एस जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यानंतर आता आज विजय दर्डांसह इतरांना शिक्षाही सुनावण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने