Weight Lose : चहा पिल्यानं तुमचं वजन कमी होऊ शकते,विश्वास बसत नसेल तर वाचा



ब्युरो टीम : वजन कमी करणं तसं सोपं काम नाही. निरोगी आणि शाश्वत वजन कमी करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या आणि काळजी घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुह्माला महिती आहे का, चहा पिण्यानं देखील वजन कमी होऊ शकतं. परंतु त्यासाठी चहा पिण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

चहामुळे वजन वाढतं, असं अनेकदा म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो, तेव्हा बरेचजण चहा पिणं बंद करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही चहानं वजन कमी करू शकता? न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी नुकतीच एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं की, चहानं तुम्ही कसं वजन कमी करू शकता.

तुम्ही लठ्ठ होत आहात का?

खरतर चहा हे कमी उष्मांक असलेलं पेय असल्यानं त्याच्या सेवनानं थेट वजन वाढत नाही. मात्र, चहामध्ये असणारे इतर घटक काहीवेळा वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशी तीन कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घेत असलेला चहा तुमचं वजन वाढवू शकतो. यातील पहिलं कारण म्हणजे चहामध्ये वापरले जाणारे फुल क्रीम दूध. चहामध्ये फुल क्रीम दूध घातल्यानं त्यातील कॅलरीज वाढतात. दुधामध्ये फॅट असते, आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्यानं वजन वाढू शकते. लिमा महाजन यांच्या मते, ‘दुधाच्या फॅटच्या टक्केवारीनुसार एका कप चहामध्ये 33 ते 66 कॅलरीज असतात.

चहाच्या कॅलरीज कमी करण्यासाठी तुम्ही फुल क्रीमऐवजी स्किम्ड मिल्क वापरू शकता. याशिवाय त्यात मिसळलेली साखर हे देखील वजन वाढण्याचं कारण आहे. याशिवाय चहासोबत बिस्किटे किंवा स्नॅक्स घेतल्यास वजन वाढते.

हे लक्षात ठेवा

झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका

झोपण्यापूर्वी चहा प्यायल्यास झोपेची पद्धत आणि पचन बिघडते. वजन नियंत्रित करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. कारण झोपेत तुमच्या शरीरातील हार्मोन्स चांगले काम करतात, जे तुमच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी काही तास अगोदर चहा पिणं टाळा.

चहा आणि जेवणाच्या वेळेत अंतर ठेवा

जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेच चहा प्यायल्यानं पचन आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो. तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अनुकूल करण्यासाठी चहा पिणं आणि तुमचं जेवण यामध्ये किमान 30 मिनिटांचं अंतर ठेवा. या सरावामुळे तुमच्या शरीराला तुमच्या अन्नातील पोषक घटक प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी वेळ मिळेल.

वजन कमी करण्यासाठी असा प्या चहा

वजन कमी करण्याच्या बाबतीत, संयम ही गुरुकिल्ली आहे. याचाच अर्थ खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं. अधिक चहाचे सेवन केल्यानं, तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात कॅफीन व त्यात आढळणारी अस्वास्थ्यकर संयुगे मिळतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. लिमा महाजन यांच्या मते, ‘तुमच्या चहाचे सेवन दिवसातून दोन कपांपर्यंत मर्यादित ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल, व  तुमचं वजन नियंत्रणात राहील.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने