Yashasvi Jaiswal : जैसवालचे 'यशस्वी' पदार्पण, केला मोठा पराक्रम

 

ब्युरो टीम : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं होतं तर तिसऱ्या दिवशी दीडशतक केलं.

तिसऱ्या दिवशी 171 धावांवर तो बाद झाला. मात्र दीडशतक झळकावताच भारताकडून सर्वात कमी वयात कसोटी पदार्पणात दीडशतक करणारा फलंदाज ठरला आहे. जैसवालने 116व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत दीडशे धावा पूर्ण केल्या. दीडशे धावा करताच यशस्वी जैस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना भारताकडून सर्वात कमी वयात दीडशे धावा करणारा खेळाडू बनला.


त्याने ही कामगरी वयाच्या 21 व्या वर्षी केली. याआधी चार फलंदाजांनी सर्वात कमी वयात दीडशे धावा केल्या आहेत. पण कोणत्याही भारतीय खेळाडूने यशस्वी जैसवालपेक्षा कमी वयात अशी कामगिरी केलेली नाही. भारताकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे.


शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना 187 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच 177 धावांची कामगिरी केली होती. यशस्वी जैस्वाल 171 धावांवर बाद झाला.


त्याने 360 चेंडू खेळताना 15 चौकार लगावले. यशस्वी जैसवालची 'यशस्वी' खेळी, पदार्पणात सेंच्युरी ठोकत रचला इतिहास! वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात खेळताना यशस्वी जैसवाल परदेशात पदार्पणात शतक करणारा पहिला भारतीय सलामीवर बनला. या सामन्यात रोहित शर्मासोबत परदेशात सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रमही त्याने केला. पदार्पणाच्या सामन्यात 387 चेंडू खेळून मोहम्मद अझरुद्दीनच्या 322 चेंडू खेळण्याच्या विक्रमाला मागे टाकलं.


पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी वयात दीडशे धावा करण्याचा विक्रम जावेद मियाँदादच्या नावावर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 1976मध्ये दीडशे पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पाकिस्तानसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जावेद मियाँदादने 163 धावा केल्या होत्या. या डावात त्याने 19 चौकार मारले होते. 19 वर्षे 119 दिवस वय असताना जावेद मियाँदादने दीडशतक झळकावलं होतं. जावेद मियाँदादशिवाय 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऑर्कि जॅक्सनने 19 वर्षे 149 दिवस वय असताना पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दीडशे धावा केल्या होत्या. तर १९६५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॉग वुल्टर्सने 19 वर्षे 354 दिवस वय असताना इंग्लंडविरुद्ध तर जॉर्ज हेडलीने 1930 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी पदार्पणात दीडशे पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने