ब्युरो टीम : तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं आहे? पण त्यासाठी नेमकं काय करावे याबाबत संभ्रमात आहात? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. वजन कमी करण्याच्या कोणत्या पद्धतीचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल, हे ठरवण्यासाठी तुमच्या राशीचा खूप फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी कोणत्या राशीच्या व्यक्तीनं नेमकं काय केलं पाहिजे, याची माहिती आज आह्मी तुह्माला देणार आहोत.
मेष
मेष राशीच्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी तात्काळ वर्कआउट, व्यायाम करण्यास सुरू करतात. परंतु अगदी घाईघाईनं सुरू केलेलं वर्कआउटमध्ये, व्यायामात ते सातत्य ठेवतं नाहीत. ते मध्येच तो सोडून देतात. अशावेळी या राशीच्या व्यक्तींनी मित्रासह वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करणं फायद्याचं ठरतं. वजन कमी करण्याची स्पर्धा मित्रांसोबत केल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तीला मिठाई आणि इतर गोड पदार्थ आवडतात, ज्यामध्ये सहसा कॅलरी जास्त असतात. वजन कमी करण्यासाठी, त्यांना त्यांच्या आहाराकडे तसेच व्यायामाच्या नियोजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी अद्ययावत सुविधांसह असणाऱ्या जीममध्ये जाऊन व्यायाम करणं फायद्याचं ठरेल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना फिरायला आवडतं. कारण त्यामुळे त्यांचा मूड चांगला राहतो. या राशीच्या व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी नियमित रनिंग करणे फायद्याचं ठरतं. वजन कमी करण्यासाठी रनिंग सुरू केल्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तीची वजन कमी करण्याची गुरुकिल्ली त्याच्या स्वयंपाकघरात असते. तुमची जर कर्क रास असेल, आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर आजच तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यदायी आहार योजना तयार करा. पौष्टिक आणि कमी कॅलरी असलेला आहार घ्या.
सिंह
सिंह राशीची व्यक्ती समाजप्रिय असते. अशा व्यक्तीला समाजातील विविध घटकांसोबत जुळवून घेण्यास आवडते. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तीला वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनी बास्केटबॉल सारख्या काही सांघिक खेळात स्वतःला गुंतवून ठेवणं फायद्याचं ठरतं.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तीला दिनचर्या ठरवून त्यानुसार काम करण्यास आवडते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तीला वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी सवयींना दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती लवकरच वजन कमी करू शकतात.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी हळूहळू सुरुवात करावी. आहार किंवा व्यायामात आवश्यक ते बदल करावेत. त्याचा नक्कीच फायदा होईल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी काहीतरी वेगळं, अवघड करणं पसंत असते. वजन कमी करण्यासाठी या राशीच्या व्यक्तींना स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा किकबॉक्सिंग उपयोगी पडते. व्यायामाच्या ज्या प्रकारामुळे त्यांचा उत्साह वाढू शकतो, अशा व्यायाम करणं त्यांना फायद्याचं ठरते.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे लागेल. अन्यथा वजन कमी करण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न ते मध्येच सोडून देऊ शकतात. या राशीच्या व्यक्तीची वजन कमी करण्याची गुरुकिल्ली म्हणजे ज्यामध्ये आनंद मिळेल, ते करणे. यामुळे त्यांना वजन कमी करण्यास मदत होते.
मकर
मकर राशीची व्यक्ती नियोजनपूर्ण आहार आणि वर्कआउट रूटीन तयार करून वजन कमी करू शकतात. एखाद्या कामाची जबाबदारी घेण्याची त्यांचा स्वभाव असल्यानं ते स्वतः बाबतीत सुद्धा तसा निर्णय घेण्यास आघाडीवर असतात. त्यामुळेच वजन कमी करण्याबाबत त्यांचा दृष्टीकोन हा जबाबदारी घेण्याचा असतो. या राशीच्या व्यक्तीसाठी वजन कमी करण्यास सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जंक फूड खाणे् बंद करणे, आणि अधिक सेंद्रिय अन्न खाणं.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्ती फक्त ठरवलं म्हणून वजन कमी करू शकत नाही. तर, या राशीच्या व्यक्तीना मजेदार, आव्हानात्मक आणि बौद्धिकदृष्ट्या चालना देणारं अशी काहीतरी गोष्ट करणं फायद्याचं ठरतं. या राशीच्या व्यक्तींना डान्स क्लासेस लावणे फायद्याचं आहे. कारण त्यामुळे त्याचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
मीन
मीन राशीच्या व्यक्ती या स्वतःच्या शरीरापेक्षा स्वतःच्या मनाच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या राशीच्या व्यक्तींना शरीर आणि आत्मा दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी योगा उपयुक्त ठरतो.
कोणत्या राशीच्या व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी काय करणे फायद्याचे ठरते, हे सांगितले जाते. अर्थात यावर कितीपत विश्वास ठेवायचा ह ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
टिप्पणी पोस्ट करा