15 Augst : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी वाघा बॉर्डर सोहळ्यात व्हा सामील ! असे करा ऑनलाईन तिकीट बुकिंग

 

ब्युरो टीम : वाघा बॉर्डरचे नाव समोर येताच डोळ्यासमोर येते ती भारत पाकिस्तानच्या जवानांनी केलेली परेड.ही परेड पाहायला मिळणे हा देखील एक थरारक अनुभव आहे. यावेळी वाघा बॉर्डरवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. येत्या १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देखील वाघ बॉर्डरवर परेडचे आयोजन केले जाणार आहे.तुम्ही देखील हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहू शकता.

वाघा हे पाकिस्तानातील लाहोरच्या वाटेवरचे गाव आहे. पाकिस्तानची वाघा सीमा भारतातील अमृतसरपासून तीस किमी अंतरावर अटारी गावाजवळ आहे. वाघा सीमेचा इतिहास तेव्हापासूनचा आहे जेव्हा 1947 मध्ये ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारत सोडला आणि देशाची भारत आणि मुस्लिम अशी विभागणी झाली. आता भारत आणि पाकिस्तानच्या वाघा सीमेवर लष्कराची चौकी आहे. याच स्थळी दोन्हही देशांमध्ये चर्चित असणारी परेड पार पडते.

वाघा बॉर्डर परेड पाहण्यासाठी तुम्ही attari.bsf.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाईन बुकिंग करू शकता. याद्वारे तुम्ही स्टेडियमच्या मैदानात तुमची जागा देखील बुक करून निश्चित करू शकता.

रोज होते परेड
वाघा बॉर्डरचा परेड रिट्रीट सोहळा दररोज दुपारी चार वाजता होतो. हा सोहळा 60 मिनिटांपासून 120 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 तासांपर्यंत असू शकतो. त्यामुळे, जर तुम्हाला इथे जायचे असेल तर 1 तास आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. येथे भेट देऊन तुम्ही फ्लॅग मर्चिंग सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकता जो सूर्यास्तापूर्वी 2 तास आयोजित केला जातो.

अमृतसरवरून जावे लागेल
येथे जाण्यासाठी पंजाबमधील अमृतसरला जावे लागेल. अमृतसरला जाण्यासाठी तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. तुम्ही तुमच्या शहरातून बस आणि ट्रेनने येथे आरामात पोहोचू शकता.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने