Agriculture: राज्यात ८ टक्के क्षेत्रावर पेरणीच नाही, १२ लाख हेक्टरवर अतिवृष्टीने नुकसान

 

ब्युरो टीम: राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने काही ठिकाणीच दुबार पेरण्या झाल्या.

राज्यातील आठ तालुक्यांमध्ये केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांचा हंगामही उलटून गेल्याने आता या ठिकाणी शेतकरी रब्बीची तयारी करत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे बारा लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी शेतकरीही रब्बी हंगामासाठीच तयारी करीत आहेत. पाच जिल्ह्यांतील ८ तालुक्यांत पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने येथे खरिपातील पेरण्या आता होणार नाहीत.

नांदेड, यवतमाळमध्ये सर्वाधिक नुकसान, १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झाले नुकसान

११,९६,९६६ हेक्टरवर नुकसान, १७ जिल्ह्यातील क्षेत्र

४,४६,७८० हेक्टर सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात

२,९१,९९५ हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात नुकसान

४३,३३६ हेक्टर जमीन राज्यात खरडून निघाली


पुरेशा पावसाअभावी पिके जळाली

राज्यात सोयाबीन व कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असून, साधारण १५ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड करणे शक्य होते. याच काळात पेरण्या झाल्या. या काळात पश्चिम कोकण व पूर्व विदर्भात सर्वत्र व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरावीक तालुक्यांतच जोरदार पाऊस झाला.

अन्यत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. काही तालुक्यांमध्ये मात्र या पेरण्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. अशा ठिकाणी विशेषतः सोयाबीन पिकाची दुबार पेरणी झाली. मात्र, हे क्षेत्र अतिशय कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे


राज्यातील पेरणी सरासरी क्षेत्र

सरासरी क्षेत्र: १,४२,२,३१८ हेक्टर

पेरणी झालेले: १,३०,६५,२५७ हेक्टर

कोकण ८०%

नाशिक ९१%

पुणे ९०%

कोल्हापूर ७६%

औरंगाबाद ९४%

लातूर ९७%

अमरावती ९६%

नागपूर ८६.%




 




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने