amir khan : आमिर खान साकारणार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका !

 

ब्युरो टीम: आमिर हा हिंदी चित्रपटसृष्टीचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

आमिरने आजवर खऱ्या कथानकावर आधारित साकारलेली पात्र पडद्यावर जिवंत केली आहेत. त्यात मंगल पांडे रायझिंग, नंतर दंगल अशा दमदार चित्रपटांचा समावेश होतो. आता यानंतर आमिर अजून एक बायोपिक करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. यात चक्क तो मराठमोळे वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा बायोपिक बनणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या.

आता बॉलिवूड स्टार आमिर खान उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकवर काम करत असल्याच्या बातम्या आहेत. या बायोपिकमध्ये निकम यांचा जीवनप्रवास तसेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यासारख्या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका मांडली जाईल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर आमिर या चित्रपटात काम करेल एवढंच नाही तर या चित्रपटाची निर्मितीही तोच करणार असल्याचं सांगितलं जात आहे.Shailesh Lodha : तारक मेहता फेम शैलेश लोढा घेणार बिग बॉसमध्ये एंट्री? या कारणामुळे रंगली चर्चासिनेमॅटिक कॉरिडॉरमधील वृत्तानुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा प्रस्ताव आमिरकडे कोरोना महामारीपूर्वी आला होता.


त्यानंतर इतर अनेक निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला, पण काही निष्पन्न झाले नाही. आता आमिर निर्माता दिनेश विजानसोबत हा चित्रपट बनवणार आहे. याआधी आमिर या चित्रपटात काम करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.मात्र, गतवर्षी लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला. अशा परिस्थितीत तो स्वत: या चित्रपटात काम करणार की नाही, हे येणारा काळच सांगेल.

आमिर सध्या निर्माता म्हणून पाचहून अधिक चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की आमिर यशराज बॅनरसोबत एक अॅक्शन फिल्म करू शकतो. मात्र, याबाबत निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे, कारण सध्या तरी आमिरने कोणत्याही प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दल बोलायचं तर, त्यांच्या 30 वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये दोषी ठरविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता या प्रसिद्ध वकिलाच्या भूमिकेत आमिर खानला पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. त्यामुळे तो खरंच या बायोपिकमध्ये दिसणार का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने