Annabhau sathe : अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 'विचारांची प्रासंगीकता' विषयावर व्याख्यानाचे आयोजन

 

ब्युरो टीम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती च्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील परिस्थितीवर प्रकाश टाकत महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात  अग्रभागी लढा दिला. त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी फार मोठी पराकाष्ठा केली होती. 

विदयापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांचा संकल्पनेतून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रासंगीकता या विषयावर आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत वसंत दादा साळवे यांचे प्रबोधनपर व्याख्यान विद्यापीठ परिसरातील अनिकेत कॅन्टीन येथे आयोजित करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमासाठी दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने