Annabhau sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची वैचारिक जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साजरी करण्यात आली



ब्युरो टीम :  २ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत माननीय वसंतदादा साळवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संवाद साधला. यावेळी विद्यापीठामधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान दुपारगुडे यांनी तर आभार प्रदर्शन ओम बोदले यांनी केले. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने