Bachhu Kadu: बच्चू कडूचे एकला मिशन चला रे ! ; तर प्रहार विधानसभा'निवडणूक स्वबळावर लढणार!

 

ब्युरो टीम: मोठी बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आता बच्चू कडू यांच्या 'प्रहार'ने देखील उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी 15 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या उमेदवारांची चाचपणी प्रहारकडून सुरू आहे.सध्या बच्चू कडू हे शिंदे समर्थक आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना ते मंत्री देखील होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.

दरम्यान आता महायुतीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास प्रहारकडू स्वबळाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, आतापासूनच प्रहारने उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भातील विधानसभा मतदारसंघांसाठी आमदार बच्चू कडू हे आग्रही असल्याचं दिसून येत आहे. प्रहारकडून 15 मतदारसंघात उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. गेल्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या उमेदवारांची सध्या प्रहारकडून चाचपणी सुरू आहे. शेतकरी, अपंगांचे हित जपणाऱ्या आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या उमेदवाराला प्रहारकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान महायुतीत सन्मापूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर प्रहार आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने