Bachhu kadu: राष्ट्रवादीचा पुढचा प्लॅन ठरला; बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाना;

ब्युरो टीम: शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. एखादा मोठा गट बाहेर पडला तर त्याला फूट म्हणतात, मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी स्थिती नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

यावर आता प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार जसे बोलतात तसे ते कधीच करत नाहीत, यासाठी एक संशोधन टीम बसवली पाहिजे असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.नेमकं काय म्हणाले कडू? बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. शरद पवार जसे बोलतात तसे कधीच करत नाहीत.

यासाठी एक संशोधन टीम बसवली पाहिजे. हा मोठा गेम आहे. शिवसेनेत जे झालं ते राष्ट्रवादीत होईल असं वाटत नाही. काही पर्याय दोघांनी ठेवले असतील, आघाडीत राहून पवार आणि युतीत राहून अजित पवार लढतील नंतर ते दोघे एकत्र येतील.

असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.काय आहे शरद पवारांचं वक्तव्य?राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जर पक्षातील एक मोठा गट बाहेर पडला तर फूट म्हणता येते, मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी स्थिती नाही. फक्त पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्याला पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार असतो, ही लोकशाही आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने