Balasaheb thorat : बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी फेर निवड



ब्युरो टीम : महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षनेते पदी फेरनिवड केली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर मतदार संघातून सलग आठव्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पाईक असलेल्या आमदार थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या असलेल्या महसूल खात्याचे मंत्री म्हणून सलग सहा वर्ष काम केले असून कृषी खात्याचे ही सहा वर्ष मंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले आहे. महसूल मंत्री असताना या खात्याला हायटेक गती दिली तर कृषी मंत्री पदाच्या काळात राज्याचे कृषी उत्पन्न सर्वाधिक वाढले होते .शालेय शिक्षण मंत्री पदाच्या काळात बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय घेताना रोहयो जलसंधारण ,खार जमीन, पाटबंधारे या विविध खात्यांमधूनही त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.

सर्वसामान्यांच्या विकासासाठी अविरतपणे काम करताना अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य ,महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे काम केले आहे. 2019 मध्ये अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना महाविकास आघाडी घडवण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्रीपद सांभाळताना कोरोना काळात केलेले काम उल्लेखनीय ठरले.

सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी तालुक्यातील विकास कामांना गती देताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लावून हे निळवंडे चे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवले आहे.

महाराष्ट्राच्या सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण ,कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आमदार थोरात यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात सरकारला आपल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांमधून धारेवर धरले होते. आज काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते म्हणून आमदार थोरात यांनी विजय वडेंटीवार यांची विरोधी पक्ष नेते पदाच्या नावाची घोषणा केली असून विधिमंडळ पक्षनेते पद हे पक्षाने त्यांच्याकडे कायम ठेवले आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने