Balasaheb thorat : महाविकास आघाडीची मुंबईत बैठक, बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया?


ब्युरो टीम : महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील बहुतेक सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार करण्यात आला. बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. निवडणूक एकत्र लढणार आहोत. जनमाणस आमच्या बरोबर आहे. विभागवार बैठका सुरू करू. १७ तारखेनंतर महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत.

गुरुजी म्हणावे की नाही असा प्रश्न

दोन आठवड्याचं कामकाज झालं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समर्थपणे लढतोय. सरकारकडून काही प्रश्नांची उत्तरं टाळली जातात. विकासाच्या अनेक प्रश्नांना सरकारकडे उत्तरं नाहीत. सोलापुरात लाठीचार्ज करण्याची नामुष्की पोलिसांवर आली. भिडे गुरुजी यांनी काय बोललं हे सांगण्याचीसुद्धा लाज वाटते. देशवासीयांना लाच वाटेल असं वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केलं. सरकार पक्ष हा भिडे गुरुजी यांना पाठीशी घालतो. भिडे गुरुजी सारख्या व्यक्तिमत्त्वाला गुरुजी म्हणावे की नाही, याचा विचार केला पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार असल्याचंही थोरात म्हणाले.

15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे दौरे

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अंबादास दानवे म्हणाले, 15 ऑगस्टनंतर महाविकासआघाडीचे दौरे सुरू होणार आहेत. महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यात महाविकास आघाडीचे नेते फिरणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात सर्व नेते राज्यात फिरणार आहेत. पावसाळ्यानंतर व्रजमूठ सभा होणार आहेत. पक्ष फोडून सत्ता स्थापन होवू शकत नाही, असंही अंबादास दानवे यांनी सुनावलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने